समर्थ ....एका संध्याकाळी
समर्थ दिसामासी मोठा होत होता..त्याचा १ वर्षाचा वाढदिवस जवळ येत होता..त्याच्या बाललीला बघून मनाला एक वेगळीच हुरहूर लागून राहते..किती सुंदर असतील ते बालपणीचे दिवस..असे वाटते..म्हणता म्हणता १ वर्षाचा कालावधी उलटून गेला पण..ह्या अन् अशा कितीतरी दिवा स्वप्नामध्ये मी ४ दिवस होतो..
त्या दिवशी म्हणजे २९ मार्चला चित्रकूटच्या टूर वरून आम्ही येत होतो..आई अन् बाबा पण होते माझे या वेळी..खूप वर्षांनी येत होते माझ्याबरोबर..यायची खूप इच्छा असताना तब्येत साथ देत नव्हती म्हणून योग येत नव्हता..पण जमून आले अन् मला जास्त आनंद झाला..जसा श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन गेला..त्याप्रमाणे मला वाटले मी काशी नाही तरी..चित्रकूटला तरी घेऊन जाऊ. आजच्या काळातले हे चित्रकूट काशी पेक्षा कमी नाही..४ दिवसात..सगळे बघायचे ते बघितले..त्यांना पण त्रास झाला नाही..त्यांनी पण बऱ्याच दिवसांनी वेगळे ठिकाण बघितले..अन् ४ पर्यटक बरोबरीचे..त्यामुळे मी पण खूप आनंदात...
अंजलीशी फोनवर सारखे बोलणे असायचे..दोन्ही मुलांना घेऊन एकटीने राहणे म्हणजे धाडसाचे होते..
नेहमी टूर वर असल्याने म्हणा..किंवा अजून पर्याय नसल्याने म्हणा तिला पण हळूहळू सवय झाली आहे..अतिशय सुंदरपणे पार्थ अन् समर्थला सांभाळते..
२९ मार्चला ८.३० ला कल्याण स्टेशनला उतरलो, फोन आलाच.पार्थ होता..कधी येतो आहेस?? .म्हटले १० मिनिटामध्ये येतोच..मुलांना पण किती भेटण्याची आस असते ते जास्तच प्रकर्षाने जाणवले..नेमकी लोकल ट्रेन उशिरा आली..त्यामुळे येईपर्यंत ४० मिनिटे गेली..रिक्षामधून गल्लीमध्ये वळलो होतो..अन् त्याच वेळी..
सोसायटीच्या आवारातून सगळे गडबडीने बाहेर पडत होते..पळत होते..मला वाटले कोणी चोर, काहीतरी घेऊन पळतो आहे..मी काही न बघता रिक्षा मधून उडी मारून बाहेर आलो..विचारले तर कळले..समर्थ घरात पडला होता..अन् अंजली त्याला घेऊन सुसाट डॉ.कडे न्यायचे म्हणून पळत होती..कॉर्नेरला पानवाला आहे तिथे दिसली..हातात निपचित पडलेला समर्थ..समोर डॉ. कडे नेले..त्यांनी सांगितले..हॉस्पिटलला न्या..
समोर काही दिसत नव्हते..रिक्षा थांबवली..सगळे ओळखीचे..त्यामुळे बरेच जण आमच्या मागोमाग हॉस्पिटल मध्ये..पण त्या ५-७ मिनिटामध्ये रिक्षामधल्या क्षणांमध्ये माझे तोकडेपण जाणवले..कितीतरी प्रयत्न केले..समर्थ माझ्या हातात निपचित पडून..डोळे सताड उघडे..हात..पाय..चोळून झाले..हलवून थापट्या मारून..कृत्रिम श्वास देऊन सगळे झाले..अंजली इतका वेळ सतत समर्थशी बोलण्याचा प्रयत्न करत होती..
आमची दोघांची स्थिती सारखीच होती..पण समर्थ रडण्याचे चिन्ह नव्हते..तो पडल्यापासून रिक्षाने डॉ. कुलकर्णी च्या क्लिनिक ला पोचेपर्यंत १२ मिनिटे तरी झाली असतील ..खरे तर खूप जोरात वरून पण पडला नव्हता..पण घाबरला असावा..दादा ग्याल्लेरीत उभा वाट बघत त्याच्या मागे हा..तिथे पाट ठेवले होते..त्यांना पकडून उभे राहताना ..तो पाट अंगावर आला..अन् साहेब..आडवे..
रिक्षामधून घाईने उतरून ४ मजले पटापट धावत संपवले..तरी समर्थचे रडणेच नव्हते..डॉ..आले लगेच..अन् त्याच वेळी तेव्हा कुठे थोडासा रडायचा आवाज आला..अन् आमच्या जीवात जीव..लगेच पल्स, हार्ट बीट मोजले..त्याचा एक्स रे काढायला सांगितला..२४ तास निरीक्षणासाठी ठेऊन घेतले..इतका वेळ असलेला ताण सैल होत गेला..अंजलीने तो रडण्याने कमी केला..तिला जास्त ताण, कारण आम्ही नसताना, कोणी नाही अशा वेळी एकटी पार्थला घरात एकटे सोडून पळत निघाली होती..योगायोगाने आम्ही पोचले म्हणून पार्थ जास्त वेळ एकटा नव्हता..आजी बरोबर तो घरी थांबला होता..त्याला फोन करून त्याचा भाऊ ठीक आहे म्हणून कळवले...एवढे एकून मगच तो शांतपणे झोपी गेला..
आम्ही रात्र जागूनच काढली..दर तासाने झोपला आहे नं..त्रास होत नाही नं...करत सकाळ कधी झाली कळले नाही..रात्री विचार करून करून डोके जास्तच दुखायला लागले..दुसऱ्या दिवशी १०.३० ला आम्ही समर्थला घेऊन सुखरूप घरी आलो..
हे एवढे सगळे का लिहिले?? दुसरा दिवस तर जागरण झाल्याने झोपण्यात गेला.. त्यानंतर मला २ दिवस चैन पडत नव्हते पण लिहून काढल्यास थोडे बरे वाटेल असे वाटले..आता लिहिले आहे..तर मग वाचा..अन् लहान मुलांच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या..हा सल्ला माझ्यासकट सगळ्यांसाठी ..
राहुल
९८१९०४२९५६
paarthrahul@yahoo.co.in

No comments:
Post a Comment