हलके फुलके..पण तरी थोडेसे गूढ......
सुरुवातीपासून
वेगळे वाटावे असे काही नव्हतेच..युगानुयुगे आपली ओळख आहे असे सतत
वाटायचे..एकमेकांना जोखणे म्हणतात ना ते याच प्रकारातले.. “पार्थ” हा यातला एक मजबूत धागा आहे याची मला पूर्ण जाणीव
आहे..त्याच्या अस्तित्वाने ओघाने पुढे हे सगळे आहेच.,
खरतरं एक
अनामिक कुतूहल पण आहे या सगळ्याबरोबर, काय हे सांगणे अवघडच आहे. पटकन सहजरीत्या
समजावून सांगणे माझ्यासारख्याला जमणारे नाही.
अजून ओळख
संपलेली नाही, अजून शिकतोच आहे,दरवेळी काहीतरी नवीन, गूढ, अंत:करणापासून ते
मनाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत, छोट्या छोट्या कप्प्यामधून नाद अजून घुमतोच आहे.,आठवणींचा,
वेदनेचा, संवेदनांचा..त्यात दरवेळी काहीतरी भरच पडते आहे..
स्वत्वाची
ओळख ही प्रत्येकाला महत्वाची वाटते, त्यासाठी धडपड करणे हे अनिवार्य आहे, खूप उंच
डोहात वरून उडी मारणे हे तसे धाडसाचे असते, पण प्रयत्नाची शिकस्त, दुर्दम्य
इच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, ह्यापुढे आव्हाने फिकी वाटतात..
बस, पुढे
जायचे, मनाच्या आनंदासारखे दुसरे काही नाही..हे सगळे करत असताना समाधानाचा आरसा
सतत समोर ठेवला की मग त्यात मध्ये मध्ये डोकाऊन बघता येते..आपण आपलीच पाठ थोपटून
घ्यायला लाज कसली?
सगळे करत
असताना मग किती त्रास, कष्ट, चिंता मध्ये आले तरी त्याचे काही वाटत नाही, शेवटी
साध्य करणे हे महत्वाचे..साध्य करताना साथ असेल तर मग सोन्याहून पिवळे, अतीव
समाधानाची एक लकेर चेहऱ्यावर नक्की दिसेल अन् त्या समाधानातून हुंकार भरून नवीन
क्षितिजे गाठायला सोबतीने पुढे जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगणे..
आज इथेच
थांबतो..
तुझाच,
राहुल

No comments:
Post a Comment