आपुलकी, आधार, जिव्हाळा
या बाळांना देऊया,
'आम्ही आहोत सदैव सोबत'
विश्वास यांना देऊया!!!
या चार ओळीनी मतिमंदासाठी कार्यरत असलेल्या अमेय पालक संघटनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. कारण या चार ओळी त्यांच्या माहिती पत्रकावर जरी असल्या तरी..त्यांच्या बरोबरीने आपण सुद्धा त्यांचे कधीतरी पालक झालो तर आपला पण आनंद द्विगुणित होईल असे वाटते..
दोन दशकापूर्वी कै. मेजर ग.कृ. काळे यांच्या प्रेरणेने घरकुलचे काम सुरु झाले..मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन 'अमेय पालक संघटना' ही संस्था स्थापन केली.
मतिमंदत्व हे अपंगत्व अन्य प्रकारापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे आहे..अन्य अपंग शिक्षण, प्रशिक्षण वा सहाय् या द्वारे पुष्कळसे स्वावलंबी होऊ शकतात. 'समजण' ही प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नाही त्यामुळे पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते..
मी बर्वेसर यांना फोन न करता निघालो..पण मला माहिती होते..ते तिथे असतीलच..त्यांची भेट झालीच ..त्यावेळी तरुण-तरुणींचा एक "सोल ग्रुप" तिथे आला होता..त्यांना माहिती सर देत होते..मलापण त्यात सामील करून घेताना सगळ्यांशी ओळख करून दिली..कशाप्रकारे काम सुरु असते..ते सांगितले..आज २४ मुले-मुली आहेत ते सगळे १८-५० वयोगटातील आहेत..आता अतिशय सुंदर वास्तू उभी राहिली आहे..शासनाच्या अनुदानाशिवाय हा प्रकल्प उभा आहे कारण सुजाण वा सहृदय हितचिंतक संस्थेस लाभले आहेत..
मी त्या दिवशी गेलो असताना, श्री.संदेश जोशी यांचा वाढदिवस साजरा करणार होते..आम्ही सगळे जण पण त्यांच्या बरोबरीने वाढदिवस साजरा करायला थांबलो..खूप छान वाटले..खेळ झाले..गप्पा झाल्या..
डोंबिवली पासून ८-९ किमी.खोणी गावामध्ये हा प्रकल्प आहे..शाळा कॉलेजचे विध्यार्थी मुलांशी मैत्री करण्यासाठी येतात..जेष्ठ नागरिक आवर्जून भेट देतात..कंपन्या व विविध कर्मचाऱ्यांचे गट येतात..इकडच्या मुलांना पण आपण भेटलो की आनंद होतो..आपल्याला पण समाधान मिळते..आपले पण या ठिकाणी स्वागत आहे.आपले वाढदिवस, आनंदाचे प्रसंग..या वेळी नक्की इकडे या..अधिक माहितीसाठी - कार्यवाह: अविनाश बर्वे ०२२-२५३३७२५०
धन्यवाद..
राहुल जोगळेकर
९८१९० ४२९५६
समर्थ संवादच्या माध्यमातून मनातल्या विषयांना आपल्या पर्यंत पोहोचवणे यासाठी हा या ब्लॉगचा खरा उद्देश..आपल्याला आवडेल तर जरूर प्रतिक्रिया द्या.
Tuesday, 19 July 2011
Thursday, 7 July 2011
"स्नेहालय" चा प्रकल्प भेटीचा अनुभव..
स्नेहालय..अहमदनगर मधिल १९८९ पासून सुरु झालेली संस्था..जसे जसे दिवस जातात तसा पसारा पण वाढत गेला होता..बऱ्याच दिवसांपासून जायचे होते..नाव कळले होते..माहिती झाली होती..मध्ये सेवान्कुर च्या शिबिर मध्ये संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी सर यांची पण ओळख झाली होती..पण ठरवून वेळ काढला की सगळे जमते..त्याप्रमाणे १९ जुन हा दिवस माझा जायचा ठरला..कुलकर्णी सरांसोबत फोन वर बोलणे झाले..
१८ जुनला मी रात्री पोहचून माझ्या काकांकडे रात्रीचा मुक्काम केला..सकाळी ८.३० ला मी तयार होऊन सरांची वाट पाहत होतो ते स्वतः आले न्यायला..
सकाळी ९ च्या सुमारास आम्ही स्नेहालयच्या एम आय डी सी च्या प्रकल्पावर प्रथम गेलो..तिथे गेल्यावर कुलकर्णी सरांनी इतर कार्यकर्ते यांच्याशी ओळख करून दिली..डोम सारख्या पहिल्या वास्तूमध्ये छान बसण्याची व्यवस्था केली आहे..तिथेच प्रकल्पाची माहिती /ओळख असलेली सीडी बघायला मिळाली..त्यामधून पुढे प्रकल्प बघताना जास्त चांगल्या प्रकारे समजले..२५ मिनिटांच्या या सीडी मध्ये खूप छान प्रकारे माहिती दिली आहे..
त्या नंतर मग मंगेश जोंधळे या युवकाबरोबर प्रकल्प बघण्यास सुरुवात केली..मागच्या बाजूलाच असलेले पिडीत / अबला महिलांसाठी राहण्याची व्यवस्था होती..तिथे २२ महिला राहतात..सगळ्या प्रकल्पामधील लोकांसाठी कपडे धुण्यासाठी मोठी मशीन आहेत..ते बघत असताना..एक ३ वर्षाची तेजल नावाची मुलगी भेटली..गप्पा मारताना एकदम प्रेमाने कडेवर येऊन बिलगून गेली..खूपच वेगळा अन् विचार करायला लावणारा क्षण होता..की आज तिच्या सारखी जवळपास ४०० मुलेमुली तिथे राहत आहेत..त्यामधील १५० पेक्षा जास्त मुलेमुली एच आय व्ही बाधित आहेत..त्या सगळ्या मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, अन्न या सगळ्याची व्यवस्था संस्थेकडून केली जाते..वेगवेगळे प्रकल्प आहेत की..स्नेहांकुर, बालभवन, कम्युनिटी केयर सेंटर आहे, दत्तक विधान केंद्र आहे,..अहो अगदी रेडिओ स्टेशन सुद्धा ते चालवतात..त्यामधून पण जनजागृतीचे काम चालू असते..
पण या सगळ्यासाठी थोडा वेळ हा काढला पाहिजे..आपल्या रोजच्या रहाटगाड्यात वेळच नसतो..हे म्हणायला जमते.एखादा दिवस वेगळा ठरवून या ठिकाणी भेट द्या..माहिती करून घ्या..अन् मग जाऊन या..मी खात्रीने सांगतो की आपले स्वतः चे दुख; बाजूला राहते..त्याचा विसर पडतो..अन् मग आपण पण जरा विचार करायला लागतो..हे मी माझ्या वरून लिहितो आहे..खऱ्या समाजाची ओळख करून घ्यायची असेल तर डोळे उघडे ठेवा..जे दिसेल ते चांगले अन् खरे असे नसते..नीट परिचय करून घेतलात तर नक्कीच समाधान मिळेल..अशा प्रकारच्या सामाजिक कामाशी जोडले जाल..आवडत असेल तरच हं..मारून मुटकून कोणतेही कामं करू नये असे म्हणतात..
मी मुद्दामून इथे पूर्ण माहिती दिली नाही आहे..स्नेहालय ची वेब साईट आहे..त्यावर पण आहेच की हो..पण असे लेख लिहिले की..आपली पण उजळणी होते..त्यावर जास्त विचार होतो..तेव्हा आता थांबतो.
धन्यवाद..
आपला

9819042956
paarthrahul@yahoo.co.in
Saturday, 25 June 2011
Monday, 13 June 2011
माझी कविता..
जे स्वप्न आम्ही मनापासून पाहिले,
"पार्थ" च्या पर्यटनातून सुरु जाहले,
पर्यटकांनी विचारले, "पार्थ", अपत्य का पहिले??
उदंड प्रेम आम्हा दोघांना त्यांचे लाभले,
आप्त स्वकीयांनी सदोदित प्रोत्साहित केले
उत्कर्षाच्या वाटेवरती नवीन घराचे स्वप्न साकारले..
या नवीन घराबद्दलचे आर्टिकल व फोटो वर्तमान पत्रामध्ये आले..
काहीना हे "पार्थ" चे पब्लिसिटी स्टंट वाटले..
अन् त्याच काळात "पार्थ " च्या चाहुलीने मन आनंदूनी गेले..
नऊ महिने अंजली बरोबर मलाही तुम्ही सांभाळून घेतले..
विवेकानंद जयंतीदिनी "पार्थ" चे आगमन झाले..
त्याला बघितल्या वर खरंच आयुष्याचे सार्थक झाले..
नवीन क्षितिजे खुणावताना वास्तवाचे भान ठेविले
आनंद वनी जाताना मन खरंच आनंदूनी गेले..
या सामाजिक पर्यटनाला मिळाला आपल्याकडून मोठा मान
एका उद्देशाने येऊन केले आपण व "पार्थ " ने सत्पात्री दान..
यापुढे माझ्या व अंजलीच्या बरोबर आता "समर्थ" संवाद न 'आपला सहपर्यटक' "पार्थ",
नक्कीच ते पूर्ण करतील आपण सर्वांचा विश्वास "सार्थ"...
- राहुल जोगळेकर.

Subscribe to:
Comments (Atom)