पुनश्च:हरिओम..पर्यटन श्रीगणेशा.
©️राहुल जोगळेकर
पोस्ट नावासहित पुढे पाठवावी.
नमस्कार पर्यटकहो,
खूप दिवसांनी नाही महिन्यांनी आपल्याशी या माध्यमातून संवाद साधण्याचा योग येतो आहे. सगळेजण कसे आहात? तब्येतीची काळजी घेत असालच , असणार आणि घ्यायलाच हवी..
आज आपण सगळेच जण कोरोना महामारीच्या विळख्यात आहोत. गेले ५-६ महिने ह्या साथीच्या रोगाने सर्व जगावर भयानक संकट आले आहे. प्रत्येक देश प्रत्येक राज्य त्यासाठी हरतह्येने हरप्रकारे उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या सर्वांना कल्पना आहे ह्या रोगाच्या प्रसारामुळे सर्व जनजीवन हे ४-५ महिने पुर्णपणे ठप्प होते, आता काही अंशी त्यामध्ये थोडी शिथिलता आली आहे त्यामुळे काही उद्योगधंदे, व्यवहार हळूहळू सुरूवात होत आहेत. त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे आणि अर्थचक्राची गती वाढण्याच्या कामी यामुळे नक्कीच मदत होणार आहे.
शासनाकडून शेतीपासून इतर अनेक उद्योगधंद्याना काही सरकारी मदतीची घोषणा होते आहे किंवा काही लघुउद्योगांना काही कर्जमाफी अथवा नवीन कर्जाच्या घोषणा होत आहेत हे सुध्दा एक प्रकारे उद्योगधंद्याना चालना देण्याचे प्रयत्न आहेत.
या सगळ्यांमधे आमच्या सारख्या पर्यटन व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारे मदत सरकार कडून मिळत नाही. तशी आमची अपेक्षा पण नाही. अशा परिस्थिती मध्ये पर्यटन व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे कारण सर्वात प्रथम तडाखा बसलेला अन् सर्वात शेवटी उभारी घेणारा हा "पर्यटन"व्यवसाय आहे. कारण प्रत्येक जण पर्यटन हे मजा, मौजमस्ती किंवा विंरगुळा म्हणून करतो. हे ठिक आहे पण आता काही काळापूरते घरात बसणे जरूरी आहे. तुम्हाला तरी आवडेल का? इतके दिवस डांबून ठेवल्यासारखे वाटते आहे नां? मला माहित आहे की तुम्ही सगळेच कोरोनाचा धोका टळला, परवानगी मिळाली की पर्यटन साठी खूप उत्सुक आहात.
या मध्ये नक्कीच फरक पडतो आहे..E pass ची अट रद्द झाली आहे..हॉटेल्स, लॉज १००% चालू करायला परवानगी मिळाली आहे. बस, मिनी बस या सुद्धा सुरू करायला परवानगी आहे..तेव्हा सगळ्या गोष्टींची पूर्तता करून योग्य ती काळजी घेऊन आपण पर्यटन सुरू करीत आहोत.आपले सहकार्य अपेक्षित आहे..
कारण पर्यटन केल्याने आपल्या मनाला येणारी मरगळ ही नक्कीच दूर होणार आहे. आज अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत.. त्यानंतर आरोग्य शिक्षण महत्वाचे आहे.. त्यानंतर पर्यटन हे सुध्दा ताजेतवाने होण्यासाठी, परत एकदा आयुष्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी गरजेचे आहे.
ह्या कोरोनाशी लढताना पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना हातात हात घालून काम करायचे आहे.. सर्व बाबतीत अतिशय चोख सेवा देणारा पर्यटन व्यावसायिक आज कुठेतरी थांबला गेला आहे त्याला परत धावायला लावण्यासाठी आपल्या सारख्या सुजाण पर्यटकांच्या छोट्याश्या पाठिंब्याची आवश्यकता आहे त्यासाठी पर्यटक आणि व्यावसायिक ह्या दोघांना एकत्र येऊन काम करायचे आहे, आपला सहभाग यामध्ये असेल अशी खात्री आहे म्हणून आपल्यापुढे हक्काने हा विषय मांडायचे धाडस केले आहे.
आम्ही " पार्थ टॅॢव्हल्स " आपल्या साठी काही योजना आणणार आहोत त्यामध्ये निराश करणार नाही ह्याची खात्री आहे.
एका वेगळ्या लेखासह आपल्यापुढे येईन तो पर्यंत आपली रजा घेतो.. माझा लेख शांतपणे वाचलात त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार!!
आपला विनित,
राहुल जोगळेकर
पार्थ टॅॢव्हल्स, डोंबिवली
9819042956
9594939356
©️राहुल जोगळेकर
पोस्ट नावासहित पुढे पाठवावी.
No comments:
Post a Comment