Saturday, 25 June 2011

श्री गणेशा.

श्री गणेशा.....हा माझा ब्लॉग चा..

Monday, 13 June 2011

माझी कविता..

जे स्वप्न आम्ही मनापासून पाहिले,
"पार्थ" च्या पर्यटनातून सुरु जाहले,
पर्यटकांनी विचारले, "पार्थ", अपत्य का पहिले??
उदंड प्रेम आम्हा दोघांना त्यांचे लाभले,
आप्त स्वकीयांनी सदोदित प्रोत्साहित केले
उत्कर्षाच्या वाटेवरती नवीन घराचे स्वप्न साकारले..
या  नवीन घराबद्दलचे आर्टिकल व फोटो वर्तमान पत्रामध्ये आले..

काहीना हे "पार्थ" चे पब्लिसिटी स्टंट वाटले..
अन्  त्याच काळात "पार्थ " च्या चाहुलीने मन आनंदूनी गेले..
नऊ महिने अंजली बरोबर मलाही तुम्ही सांभाळून घेतले..
विवेकानंद जयंतीदिनी "पार्थ" चे आगमन झाले..
त्याला  बघितल्या वर खरंच आयुष्याचे सार्थक झाले..
नवीन क्षितिजे खुणावताना वास्तवाचे भान ठेविले
आनंद वनी जाताना मन खरंच आनंदूनी गेले..
या सामाजिक पर्यटनाला मिळाला आपल्याकडून मोठा मान
एका उद्देशाने येऊन केले आपण व "पार्थ " ने सत्पात्री दान..

यापुढे माझ्या व अंजलीच्या बरोबर आता "समर्थ" संवाद न 'आपला सहपर्यटक' "पार्थ",
नक्कीच ते पूर्ण करतील आपण सर्वांचा विश्वास "सार्थ"...
                                                                                          - राहुल जोगळेकर.